|Sunday, July 22, 2018
You are here: Home » उद्योग » प्रवासी कार विक्रीत 15 टक्के वाढ

प्रवासी कार विक्रीत 15 टक्के वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशांतर्गत प्रवासी कार विक्रीत जुलै महिन्यात 15.12 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात एकूण 2,98,997 युनिट्स कारची विक्री करण्यात आली असून गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 2,59,720 युनिट्स होता. एसयुव्ही विक्री चांगली विक्री झाल्याने ही वाढ झाली असे सांगण्यात आले. सियामकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत कार विक्री जुलै महिन्यात 1,92,773 युनिट्स होती. जुलै 2016 मध्ये हा आकडा 1,77,639 युनिट्स होता.

मोटारसायकल विक्रीत 16.9 टक्क्यांनी वाढ होत 10,48,657 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 8,97,084 युनिट्सची विक्री झाली होती. एकूण दुचाकी विक्री 13.73 टक्क्यांनी वाढत 16,79,055 युनिट्सवर पोहोचली. व्यावसायिक वाहन विक्रीत 13.78 टक्क्यांनी वाढ होत 59 हजारावर पोहोचली. देशातील एकूण वाहन विक्रीत 13.3 टक्क्यांनी वाढ होत 20,78.313 युनिट्सवर पोहोचली आहे. जुलै 2016 मध्ये हा आकडा 18,34,302 युनिट्स होता.

Related posts: