|Sunday, July 22, 2018
You are here: Home » उद्योग » संपूर्ण सप्ताहात बाजार 3.5 टक्क्यांनी घसरला

संपूर्ण सप्ताहात बाजार 3.5 टक्क्यांनी घसरला 

बीएसईचा सेन्सेक्स 318, एनएसईचा निफ्टी 109 अंशाने कमजोर

वृत्तसंस्था / मुंबई

संपूर्ण सप्ताहात भांडवली बाजार घसरण होत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाले. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 31,128 आणि निफ्टी 9,685 वर स्थिरावला. बाजार आता 5 जुलैच्या पातळीवर पोहोचला आहे.

बीएसईचा सेन्सेक्स 318 अंशाने घसरत 31,213 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 109 अंशाने कमजोर होत 9,711 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली रिकव्हरी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरत 24,725 वर बंद झाला. हा निर्देशांक 14,485 पर्यंत घसरला होता. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 टक्क्यांनी कमजोर होत 17,360 वर स्थिरावला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 15,065 वर बंद झाला.

वाहन, एफएमसीजी, धातू, पीएसयू बँक आणि भांडवली वस्तू निर्देशांक समभागात सर्वाधिक घसरण झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 1.4 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्के, धातू निर्देशांक 3.4 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 4.9 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.2 टक्क्यांनी कमजोर झाला. निफ्टीचा औषध निर्देशांक केवळ 0.10 टक्क्यांनी वधारला.

दिग्गज समभागांची कामगिरी

डॉ. रेड्डीज लॅब, अरबिंदो फार्मा, गेल, ऍक्सिस बँक, टाटा मोटर्स डीव्हीआर, ल्युपिन, विप्रो 3.5-0.6 टक्क्यांनी वधारले. हिंडाल्को, वेदान्ता, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, बॉश, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रिलायन्स इन्डस्ट्रीज, एल ऍण्ड टी, एनटीपीसी 7.2-2.2 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात टाटा ग्लोबल, सन टीव्ही, सीव्ही कंज्युमर, जीई टी ऍण्ड टी आणि एचपीसीएल 5.1-3.7 टक्क्यांनी वधारले. सेन्ट्रल बँक, टीव्हीएस मोटार, युनियन बँक, अदानी पॉवर, बर्जर पेन्ट्स 10.7-4.2 टक्क्यांनी कमजोर झाले.

स्मॉलकॅप समभागात 63 मूंस टेक, टीव्ही टुडे, वॅस्कॉन इंजीनिअर, किरी इन्डस्ट्रीज, ग्लोबल ऑफशोर 18.4-7.3 टक्क्यांनी वधारले. सिग्निटी टेक, इंडो काउंट, प्रेसिजन कॅमशाफ्ट, संघवी मुव्हर्स आणि जयप्रकाश असोशिएट्स 17.9-8.8 टक्क्यांनी घसरले.

आठवडय़ातील कामगिरी

चालू आठवडय़ात सेन्सेक्स 3.4 टक्के आणि निफ्टी 3.5 टक्क्यांनी घसरले. बँक निफ्टी 3.4 टक्क्यांनी कमजोर झाला. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 5.5 टक्के आणि बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 5.4 टक्क्यांनी घसरला.

Related posts: