|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शपथबद्ध

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शपथबद्ध 

निःपक्षपातीपणाने कार्य करण्याचे प्रतिपादन, राज्यसभेच्या अध्यक्षपदी पहिले भाषण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतिपदाची शपथ देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यानंतर व्यंकय्या नायडू यांची राज्यसभेच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली. नियमाप्रमाणे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नायडू यांनी अध्यक्षपदावरून केलेल्या पहिल्या भाषणात आपण सर्व पक्षांचे असून निःपक्षपातीपणाने कार्य करू असे प्रतिपादन केले.

घराण्याचा पाठिंबा नाही

आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. स्वकष्टाने आपली जडणघडण झाली आहे, घराण्याच्या पाठिंब्यामुळे नव्हे. आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा धरत आहोत. या सभागृहाच्या सर्व सदस्यांनी देशातील सर्वसामान्यांच्या चेहऱयावर हसू उमटेल असे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related posts: