|Sunday, July 22, 2018
You are here: Home » leadingnews » शरद यादव यांची संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती

शरद यादव यांची संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांची संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. शरद यादव यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पक्षाचे ज्येष्ठ नेते आरसीपी सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन केले. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी नितीशकुमारांवर अनेकदा टीकाही केली होती. त्यानंतर नितीशकुमारांनी शरद यादव यांना वेगळे पर्याय असल्याचे सांगत टोला लगावला होता.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींनंतर आज अखेर शरद यादव यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्याने संसदीय समितीच्या गटनेते पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे.

 

Related posts: