|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » दानवेंनी थकवले 2 लाखांचे वीज बिल

दानवेंनी थकवले 2 लाखांचे वीज बिल 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भोकरदनमधील घराचे तब्बल 2 लाख 59 हजारांचे वीज बिल थकवल्याची माहिती मिळत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दानवेंनी वीज बिलाचा एकही पैसा भरला नाही.

दानवेंनी त्यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात कोटय़वधींचा खर्च केला होता. मात्र, त्यांनी आता अडीच लाखांचे वीज बिल थकवले आहे. याबाबतची माहिती मिळताच संपूर्ण मराठवाडय़ात चर्चा सुरु आहेत. महावितरण विभागाचे दानवेंनी अडीच लाखांचे बिल थकवले. मात्र, महावितरण विभागाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दानवेंना सर्वसामान्य जनतेपेक्षा वेगळा नियम का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

Related posts: