|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दोन रेल्वेंच्या धडकेत इजिप्तमध्ये 40 ठार

दोन रेल्वेंच्या धडकेत इजिप्तमध्ये 40 ठार 

कैरो :

 इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांची समोरासमोर टक्कर झाल्याने झालेल्या भीषण अपघातात 40 प्रवासी ठार झाले आहेत. तसेच 125 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या दशकभरात घडलेला हा सर्वात भीषण अपघात आहे अशी माहिती इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

अलेक्झांड्रियाहून एक प्रवासी रेल्वे कैरोच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान खोर्शिद येथे या रेल्वेचे दुसऱया रेल्वेला धडक बसली. दोन रेल्वे गाडय़ांची टक्कर नेमकी कशी झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून रुग्णवाहिकांच्या आधारे जखमी रुग्णांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Related posts: