|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर दौऱयावर

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर दौऱयावर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले रविवार 13 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. विविध कार्यक्रमात मंत्री आठवले सहभाग घेणार असून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशीही काहीकाळ संवाद साधणार आहे. मंत्री आठवले यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिली.

मंत्री आठवले यांचे रविवारी सकाळी 7:20 वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरात आगमन होणार आहे. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे जाणार असून सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांचा वेळ राखीव असेल. त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून ते कसबा बावडा येथे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामप्रसाद कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे सकाळी 10:30 वाजता होणाऱया जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. मंत्री आठवले बऱयाच कालावधीनंतर कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. सकाळी रेल्वेस्थानकावर त्यांचे जिल्हा रिपाइंच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, तसेच मंत्री आठवले यांची दौरा मार्गावर स्वागत करावे, असे आवाहनही उत्तम कांबळे यांनी केले आहे.

Related posts: