|Saturday, August 12, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » एस.पी.साहेब वाहतूक पोलिसांनाच लावा ‘शिस्त’एस.पी.साहेब वाहतूक पोलिसांनाच लावा ‘शिस्त’ 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात नव्याने आलेली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याप्रमाणेच पांढऱया वर्दीतील कर्मचारीही वागू लागले आहेत. नियमाची एwसितैसीच करत ग्रामीण भागातल्याच वाहनधारकांवर दंडूका अन् शहरातल्यांना ठेंगा असाच प्रकार सध्या सुरु आहे. दरम्यान, पोलिसांच्या वाहनांना नियम नाहीत, सर्व काही फ्रिमध्ये आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांना नियम शिकवणारे व शिस्त लावणारे नव्याने कोण वाहतूक मित्र मिळतील काय अशी मागणी साताकर जनतेतून होवू लागली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या ‘अजब फतवेगिरी’मुळे सातारकरांमधून उद्रेक होण्याची शक्यताही व्यक्त होवू लागली आहे.

सातारा शहरात असलेल्या वाहतूक शाखेमध्ये अनेक तऱहेचे अनेक कर्मचारी आहेत. कर्मचारी नियमाला बडगा सर्वसामान्यांवरच उगारत आपण किती कायद्याने वागतो हेच दाखवत कारवाई करत राहतात. ग्रामीण भागातून आलेल्या दुचाकीधारकांनाच पकडण्याची यांना कला अवगत आहे. शहरातीलही नियम मोडणाऱयांनाही सवलत दिली जाते. त्यामध्येच वाहतूक शाखेचे निरीक्षक युवराज हांडे यांच्याकडे पदभार आल्यापासून काही कर्मचाऱयांचा थाटच वाढला आहे. ज्या प्रमाणे कारभारी बदलला की सगळेच बदलतात. तसाच प्रकार सध्या वाहतूक शाखेत सुरु आहे. शहरात इनमिन तीन रस्ते. या रस्त्यालाही वनवे असला तरीही ठिकठिकाणी नो एन्ट्रीचे बोर्ड लावलेले नाहीत. येथे वाहन पार्किंग करु नये अशा पाटय़ा लावल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेला वाहनधारक न चुकता वाहतूक पोलिसांच्या गळयातील सावज बनतो. मग त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होतो. लायसन, पीयुसी, हेडलाईट नाही, नंबर प्लेट नाही, धुर मारतेय, चुकीच्या बाजूने चालला आहे कसा, असे एक ना भाराभर प्रश्न विचारले जातात. दुचाकीधारक विनंती करतो, तरीही यांना गयावाया येत नाही, त्यामध्येच काही ठिकाणी तर चक्क गोड बोलून जवळ बोलवून कारवाई केली जाते. पावती मात्र नेमकी दंड मात्र दुप्पट असा काहीसा प्रकार सुरु आहे. सातारा शहरातील वाहतूक शाखेला पोलिसांची काही वाहने चक्क नियम मोडून रस्त्यावर सुसाट धावत असतात. त्यांना सवलत कशासाठी कायदा सर्वांना समान आहे, असे सांगितले जाते तर यांना फ्री कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाहतूक मित्र यांचे जावई काय?

प्रत्येक जण शहरातील व जिह्यातील नागरिकांना रस्त्याचे चांगले ज्ञान आहे. नियमांची अंमलबजावणीही करतात. मात्र, सातारा वाहतूक शाखेकडे काही वाहतूकीच्या नियमांचे ‘मधूर’ बोलून ‘शेंबडे’ पणा करणारे जवळ बाळगले आहेत. त्यांच्याकडून नियमाची तिलांजली वाहिली जाते. सातारा शहरात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले गेले तर हेच वाहतूक मित्र कितीदा नियम मोडतात तेही वाहतूक पोलिसांना समजेल. दुचाकी वाहनधारकांना जवळ गोड बोलून नियमांचा कित्ता सांगणाऱया अशा वाहतूक मित्रांमुळेही वाहतूक पोलिसांची बेअब्रु होवू लागली आहे. याकडेही पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!