|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी जिह्यातील सर्व स्तरातून निषेध

पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी जिह्यातील सर्व स्तरातून निषेध 

शहर प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहर पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी जिह्यातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. तालुक्यातील वाढलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक धोरण अवलंबण्याची मागणी लोकांमधून होत आहे .

 फलटण शहरात गावगुंडानी हैदोस घातला असून त्यामुळे अनेक व्यावसायिक, सर्वसामान्य जनता या मुळे मेताकुटीस आली आहे. काल याचा प्रत्यय काल दस्तुरखुदः  पोलिस अधिकारी यांनाही आला. या मारहाणीच्या  घटनेमुळे साताराहून  अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, डि.वाय.एस.पी. रमेश चोपडे यांनी त्वरित भेट देऊन घटनेची माहिती घेऊन संबंधित घटनेचा निषेध  व्यक्त करून फलटण शहरात फोफावलेली गुंडगिरीची मुसक्या आवळण्यासाठी हालचाली  सुरू केल्या आहेत. गुंड प्रवृत्तींवर कडक कारवाई  करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्या आहेत. फलटणची जनता काल झालेल्या भ्याड हल्याविषयी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे. याशिवाय अनेक सामाजिक संघटना, मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी संघटना, आर.पी.आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी आदींनीही या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे.

  दरम्यान, पोलिस निरिक्षक प्रकाश धस यांच्यावर आज सकाळी खाजगी दवाखान्यात  जबडय़ावर यशस्वी शस्त्रक्रिया करणेत आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

 

Related posts: