|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रामिण व शहरी भागात बसमध्ये वाय-फाय

ग्रामिण व शहरी भागात बसमध्ये वाय-फाय 

प्रतिनिधी/ सातारा

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन धावणाऱया बस विडी-सिगारेटचा वास आणि फाटलेल्या सीटस अशी ओळख धारण केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने आता कात टाकायला सुरूवात केली आहे. जिल्हयातील वेगवेगळया रस्तांवर धावणाऱया बसेस मध्ये एसटीने आता प्रवाशांना मोफत वाय-फाय ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हयातील सातारा, कराड व फलटण  बसेसमध्ये वाय-फाय बसवण्यात आला असून उर्वरीत बसेसमध्ये लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग करून प्रवाशांना आता चित्रपटदेखील बघता येणार आहेत. अशी माहिती विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. तरूण भारतने सातारा विभागाला वाय-फायचे वावडे अशी बातमी प्रसिध्द केली होती, त्याची दखल घेऊन वाय-फाय सुरू करण्याचे काम सुरू आहे.

  स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यस्तरावरूनच याबाबतचे नियंत्रण करण्यात येत असून जिल्हयात सर्व ठिकाणच्या बसेसमध्ये हे वाय-फाय उपलब्ध राहणार आहे. येत्या काळात सर्व प्रकारच्या बसेसमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हयात  ऑगस्ट पासुन हे काम सुरू झाले आहे. जिल्हयात असलेल्या 700 बसेस पैकी 50 ते 60 बसेसमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

   जिल्हयाच्या आगरातील 700 बसेस मध्ये ही सेवा सुरू करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सदर काम पुर्ण झाल्यानंतर जिल्हयातील लालपरी शंभर टक्के ऑनलाईन होणार आहे ही सुविधा हिरकणीपासुन ते साध्या बसेसमध्येही देण्यात आल्यामुळे सर्वांना या सेवेचा फायदा होणार आहे. एसटीचे जुने स्वरूप बघणाऱया प्रवाशांसाठी हा बदल आश्चर्याचा सुखद धक्का देणारा निर्णय ठरला आहे. येत्या काळात सर्व प्रकारच्या बसेसमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामंडळाने हे हायटेक पाऊल उचलले आहे. मराठी, हिंदी चित्रपट काही मालिका व मराठी नाटक या सुविधेमुळे प्रवाशांना बघता येणार आहे. या सेवेमध्ये व्हॉटसऍप व इंटरनेटची सुविधा मात्र उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा थोडा हिरमोड झाला आहे.

असे वापरता येईल वाय-फाय

प्रवाशांना बसमध्ये या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील वायफाय वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर kivi ची निवड केल्यानंतर सेटिंग्जमधून बाहेर पडून crome ब्राऊजर उघडावे लागेल. त्यानंतर kivi.com टाईप करून इंटर केल्यानंतर चित्रपट, नाटक व मालिका बघायला मिळेल. प्रवाशांना प्रवासात फक्त एकदाच वायफाय कनेक्ट करावा लागणार आहे. मनोरंजन मेन्यू महिन्यातून दोनदा रिप्रेश केला जाणार आहे. त्यामुळे दरवेळेस प्रवास करताना नवीन सिनेमा वाय-फाय सेवेव्दारे उपलब्ध होणार आहेत. या यंत्रात काही बिघाड आल्यास दुरूस्तीसाठी प्रत्येक डेपोत एक टेक्निशियन ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक सीटवर स्टिकर

वाय-फाय  सुविधा देण्यात आलेल्या बसमध्ये प्रत्येक सीटसमोर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात आले असून त्यात या सुविधेबददल माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला विनाडेटा मोबाईलवर सिनेमा, एसटीचा प्रवसा, करमणूक हमखास असेही स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

 

 

 

 

Related posts: