|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकअदालतीत 1669 खटले निकालात

लोकअदालतीत 1669 खटले निकालात 

प्रतिनिधी / बेळगाव

लोकअदालतीमध्ये शनिवारी विविध प्रकारचे 1669 खटले निकालात काढण्यात आले असून तब्बल 3 कोटी 35 लाख 35 हजार 563 रुपयांची देवघेव झाली आहे. शनिवारी न्यायालयाची सुटी रद्द करण्यात आली होती. यामुळे अनेक वकिलांना इतर कामे सोडून लोकअदालतीमध्ये भाग घ्यावा लागला. याचबरोबर न्यायाधीशांना तेथे उपस्थित राहावे लागले. न्यायालय सुरु राहिल्याने या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या लोकअदालतीमध्ये अधिक तर चेक बॉन्स, बँक व सोसायटय़ांचे खटले निकालात काढले गेले आहेत. थकित कर्जदारांनी व्याज सूट मिळावी यासाठी न्यायाधीशांकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर न्यायाधीशांनी संबंधित सोसायटीच्या व्यवस्थापकाला व त्याच्या वकिलाला सूचना देवून खटले निकालात काढले. लोकअदालतीमध्ये हे खटले निकालात लागत असल्याने न्यायालयांवरील काहीसे दडपण कमी होवू लागले आहे. वर्षभरात हजारो खटले या लोकअदालतीमध्ये निकालात काढले जात आहेत. यामुळे पक्षकारांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश किरण किणी यांच्या नेतृत्वाखाली ही लोकअदालत भरविण्यात आली. विविध सहकारी संस्था, बँका याचबरोबर हेस्कॉम व बीएसएनएलचे प्रलंबित खटले निकालात काढले गेले. याला पक्षकारांनी व वकिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. वकिलांनाही न्यायालय सुरु असल्याने बरीच धावपळ करावी लागली. मात्र पक्षकाराच्या हितासाठी वकिलांनी इतर कामे सोडून लोकअदालतीवर अधिक भर दिला. त्यामुळे निकालात काढण्यात आलेल्या खटल्यांची संख्या मोठी होती.

Related posts: