|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » Top News » नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलन ; 36 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलन ; 36 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / काठमांडू :

नेपाळमधील अनेक जिह्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण नेपाळच्या सुन्सारी जिह्यातील 7, सिंधुली जिह्यातील 4, झापातील 4, मोरांग आणि इतर जिह्यातील अनेकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मंत्रालयाचे प्रवक्ता दीपक काफ्ले यांनी सांगितले, मोरांग जिह्यातील सुंदर हरेचामध्ये किमान तीन वृद्ध बेपत्ता झाले आहेत. तसेच सुन्सारी जिह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या बचावपथक येथे युद्धपातळीवर काम करत आहे.

Related posts: