|Wednesday, May 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जैव वैद्यकिय कचरा रस्त्यावर

जैव वैद्यकिय कचरा रस्त्यावर 

प्रतिनिधी/ गोडोली

शहरात स्वाईन पल्यू व डेंगूची साथ घोंगावत असताना अशा रुग्णांच्यावर औषधोपचार करत असलेल्या काही रुग्णालयांनी वैद्यकिय कचरा रस्त्यावर टाकला आहे. कल्याणी शाळेसह काही महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी या ठिकाणावरुन ये जा करत असलेल्या कल्याणी इस्टेट परिसरातील रस्त्यावर असा कचरा उघडयावर टाकण्याचा प्रताप केला आहे. नगरपालिका प्रदुषन नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणाऱयावर वैद्यकिय व्यवसायिकांवर कारवाई करणार का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि पालक वर्गातून केला जात आहे. 

वैद्यकिय कचरा उघडयावर टाकणे हा गंभीर गुन्हा सातत्याने करणाऱया कल्याणी नगरमधील मोठय़ा व्यवसायिकांवर नगरपालिका किंवा प्रदुषण मंडळ कारवाई का करत नाहीत. त्याचप्रमाणे येथील परिसरात आठ ते दहा हॉस्पिटल असल्याने  अशा स्वरुपाचा कचरा सुध्दा सार्वजनिक कचरा कुंडीत नेहमीच टाकलेला दिसतो. कल्याणी शाळा, काही महाविद्यालय, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, अनेक व्यवसाय असलेल्या या परिसरात असा वैद्यकिय कचरा उघडयावर टाकण्याचे धाडस करणा-यांवर कडक स्वरुपाची कारवाई करण्याची वेळ आली आहे.

   सातारा शहरातील जैव वैद्यकिय कचरा गोळा करुन त्याची शास्त्राsक्त पध्दतीने विल्हेवाट लावणारा हॉस्पिटल असो.चा नेचर निड हा आदर्शवत प्रकल्प आहे. मात्र येथील रस्त्यावरती सातत्याने कचरा टाकला जात असल्याचे दिसून येते. या रस्त्यावरुन कल्याणी शाळेसह काही महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी ये – जा करतात. अनेक वेळा विद्यार्थी कचरा म्हणून टाकलेल्या सुई, सलाईनच्या पाईप काढून खेळताना दिसतात. यामुळे हा कचरा अनेकांच्या आयुष्याला धोकादायक ठरु शकतो. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधीच्याकडून कचऱयांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. पैशाच्या हव्यासाने पछाडलेल्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

जैव वैद्यकिय कचरा हा शास्त्राsक्त पध्दतीने विल्हेवाट लावला पाहिजे. तसेच हा उघडयावर टाकल्याने रोगराई अधिक पसरते. विद्यार्थ्यांनी गंमत म्हणून असा कचरा हाताळल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतो. राज्याला आदर्शवत जैव वैद्यकिय कचरा निर्मुलन प्रकल्प सातारामध्ये असून उघडयावर असा कचरा टाकणाऱयांवर नगरपालिकेने तात्काळ कडक कारवाई करावी.

Related posts: