|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » छातीपर्यंत पाणी तरीही मातृभूमीचे रक्षण

छातीपर्यंत पाणी तरीही मातृभूमीचे रक्षण 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

पुरामध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाण्यात जवान आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असल्याचा फोटो सीमा सीरक्षा दलाने जारी केला आहे.उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपले सैनिक सीमेवर पहारा देत आहेत. हे फोटो पाहुन आपल्या जवानांबद्दल अभिमान आणखीच वाढेल.

देशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे.परंतु अशा कठीण स्थितीही पेट्रोलिंग करणाऱया बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत.

 

Related posts: