|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव यादगार

सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव यादगार 

कणकवली : तरुणाईच्या उत्साहाचा जोश, त्यातच मन धुंद करून टाकणाऱया संगीतावर थिरकणारे पाय आणि प्रत्येक अदाकारीला उपस्थित शेकडो तरुणाईकडून मिळणारा लाजवाब प्रतिसाद यामुळे 34 महाविद्यालयांतील 1500 विद्यार्थ्यांच्या सहभागाने येथील एसएसपीएम इंजिनियरिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला मुंबई विद्यापीठाचा 50 वा युवा महोत्सव यादगार ठरला.

मुंबई विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव हरकुळ बु. येथील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. रात्री ऊशिरापर्यंत चाललेल्या या महोत्सवात शेकडो युवकयुवती सहभागी झाले होते. त्यांनी विविध कला सादर केल्या. महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत तरुणाईने विविध कलाविष्कार सादर केले.

सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव

दोन वर्षांपूर्वी याच महाविद्यालयात 48 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख नीलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सांगे, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रशांत कुळकर्णी, भरत सावळ, हेमंत भालेकर, जगन्नाथ पाटील, संपदा माने, रंजना राजा, रघुनंदन बर्वे, उपेंद्र दाते, रुपा सावे, रावसाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.

42 कला प्रकारांचा समावेश

प्राचार्य सांगे म्हणाले, संस्थेचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे हा महोत्सव येथे होत आहे. महोत्सवात कला, वाणिज्य आणि शास्त्र अशा 34 महाविद्यालयांतील 1500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात पाच गटांत 42 प्रकारांचा समावेश आहे. यात भारतीय शास्त्राrय संगीत, शास्त्राrय वादन, सुगम संगीत, समूहगीत, पाश्चिमात्य वादन, पारंपरिक वादन, लोककला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, कथालेखन, प्रश्नमंजुषा, चित्रकला, कोलाज, रांगोळी, मेहंदी अशा 42 प्रकारांचा समावेश आहे.

महोत्सवात नवीन कला प्रकारांचा समावेश

प्रा. सावे म्हणाले, विद्यापीठाच्या महोत्सवातून अभिनेता विवेक ओबेरॉय, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी कलावंत पुढे आले. विद्यापीठ पातळीवर होणाऱया अशा महोत्सवातून विद्यार्थी आपले भवितव्य घडवित असतात. मुंबई विद्यापीठाचा हाच हेतू असून त्याच पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सहभागी महाविद्यालयांची संख्या वाढली असून ही चांगली घटना आहे. यावर्षी पासून महोत्सवात नवीन कला स्पर्धा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रा. डॉ. नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत कुळकर्णी यांनी आभार मानले. रात्री ऊशिरापर्यंत महोत्सवात सहभागी तरुणाईने आपल्या विविध कला सादर केल्या.