|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहीद वीरांचे स्मरण चिरतं न व्हावे : के.व्ही. म्हेत्रे

शहीद वीरांचे स्मरण चिरतं न व्हावे : के.व्ही. म्हेत्रे 

प्रतिनिधी/ सातारा

ऑपरेशन कारगीलची गौरवगाथा आपल्या रक्ताने लिहिणाऱया शहीद वीर शशिकांत शिवथरे यांच्या मायभूमीत येऊन त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्याची, त्यांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करण्याची मला जी संधी प्राप्त झाली ते मी स्वत:चे भाग्य समजतो अशी भावना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वाईचे के. व्ही. म्हेत्रे यांनी शशिकांतच्या 17 व्या स्मृतीदिनानिमित्त व्यक्त केली.

कळंभे ता. वाई येथील शाळेतील विदयार्थ्यांनी प्रभातफेरी काढून आदराजंली वाहिली या प्रसंगी मुलांना खाऊ व साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास किसनवीरचे संचालक मधुकर बाबा शिंदे, शिक्षक बॅकेचे संचालक शिवाजी शिदे, सुरेश दुदुस्कर, दिलीप जाधव, प्रकाश मोहिते, संतोष मासाळ, हणमंत गायकवाड, गजानन गायकवाड, सुनील शिवथरे, तसेच पुंटुबियावर प्रेम करणारे शिक्षकवृंद, ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

 

 

Related posts: