|Thursday, June 20, 2019
You are here: Home » उद्योग » सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे 92,000 कोटी रुपये थकित

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे 92,000 कोटी रुपये थकित 

प्रतिनिधी/ नवी दिल्ली

जाणूनबुजून कर्जाची परतफेड न करणाऱया (विलफूल डिफॉल्टर) कर्जदारांनी थकवलेल्या कर्जात 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे 2016-17 वित्त वर्षाच्या अखेरीस एकूण थकित कर्जाचा आकडा 92,000 कोटी रुपयाच्या पलीकडे पोहचल्याची चिंताजनक माहिती सार्वजनिक बँकेकडून देण्यात आली आहे.

2015-16 वित्तवर्षाच्या अखेरीस ही थकीत रक्कम 76,685 कोटी रुपये इतकी होती. 20.4 टक्के दरांनी त्यात वार्षिक वृद्धी होत 2017 च्या अखेरीस विलफूल डिफॉल्टरसनी थकवलेली रक्कम 92,376 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर याबरोबरच  कर्ज थकबाकीदारांच्या संख्येत 10 टक्क्मयांनी वाढ नोंदवली गेली आहे. गत आर्थिक वर्षाच्या अखेरीस 8,167 जणांकडून कर्ज थकवण्यात आले होते. यावषी अशा थकबाकीदारांची संख्या 8,915 वर पोहचल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

8,915 32,484 कोटी रुपये थकवणाऱया 1,914 प्रकरणात बँकांनी रीतसर तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे. तर स्टेट बँक आणि त्याच्या 5 सहयोगी कंपन्यासहीत 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 81,683 कोटी  रुपयांच्या कर्जवसुलीबाबत आशा सोडत हे कर्ज निर्लेखित केले आहे. मागील पाच आर्थिक वर्षातील ही सर्वोच्च रक्कम असून गत वित्तवर्षाच्या तुलनेत त्यात 41 टक्क्मयांची वाढ झाली आहे.