|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केलीय

देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केलीय 

प्रतिनिधी/ मडगाव

देशाने स्वातंत्र्यानंतर सर्व क्षेत्रात प्रगती केलीय, आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश प्रगतीच्या मार्गावर आहे. हल्लीच माल व सेवा कर अर्थात जीएसटी या नव्या कर प्रणालीवर भर देवून संपूर्ण देश एका सूत्रात बांधण्यात आला आहे. आज सर्वांनीच डिजिटल सेवेचा वापर करून जीएसटीला मजबूती देणे आवश्यक असल्याचे मत दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यदिना निमित्त दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पोलिसांकडून सलामी स्वीकारली. या प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देशाने स्वातंत्र्यानंतर केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. आज तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर होत आहे. त्यात डिजिटल सेवेमुळे आपले आर्थिक व्यवहार सुद्धा डिजिटल मोडवर होऊ लागले आहेत. त्यात जीएसटीने सर्वांना एका सूत्रात गुंतले आहे. यातून देशाच्या विकासाला मदत होईल.

अंहिसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळू शकते हे महात्मा गांधीजी नी साऱया विश्वाला दाखवून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात सर्व धर्मातील व जातीतील लोक सहभागी झाले. त्यात कोणताच भेदभाव नव्हता किंवा गरीब-श्रीमंत असा विचार देखील नव्हता. सुशिक्षित-अशिक्षित असा देखील कुठे उल्लेख झाला नव्हता. सर्व जण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपआपल्या परिने झटत होते. हेच स्वातंत्र्य लढय़ाचे मोठे पण होते.

आज देश संपूर्ण जगात बलाढय़ असल्याचे दाखवून देण्यासाठी सर्वाचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे उद्गार देखील श्रीमती शेरावत यांनी काढले.

या कार्यक्रमाला मंत्री किंवा एकाही आमदाराने उपस्थिती लावली नाही. माजी मच्छीमार मंत्री आवेर्तान फुर्तादो तसेच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष नवनाथ नाईक यांची तेव्हढीच उपस्थिती होती. फातोर्डाचे आमदार तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आपल्या घरासमोर आपल्या कार्यकर्त्यां सोबत झेंडावदन केले.

Related posts: