|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ग्रामीण टपाल कर्मचाऱयांचे धरणे आंदोलन

ग्रामीण टपाल कर्मचाऱयांचे धरणे आंदोलन 

बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामीण विभाग टपाल कर्मचाऱयांनी बुधवारपसून धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन छेडले आहे.

ग्रामीण विभाग टपाल कर्मचारी वर्गाच्या समस्यांकडे खात्याने दुर्लक्ष केले आहे. सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱयांवर अन्यायाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मांडली आहे. बेळगाव विभागात येणाऱया सर्व ग्रामीण टपाल कर्मचारी वर्गाने आंदोलनात भाग घेतला होता.

Related posts: