|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » आदित्य बिर्लांच्या ऍप्लॉजची धूरा समीर नायरांकडे

आदित्य बिर्लांच्या ऍप्लॉजची धूरा समीर नायरांकडे 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या वैयक्तिक मालकीची अप्लॉज एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुनरुज्जीवित करण्यास समीर नायर यांची निवड केली आहे. नायर यांनी गत महिन्यातच करमणूक माध्यम क्षेत्रातील दिग्गज कंपनी बालाजी टेलिफिम्सच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. तर ब्लॅक आणि देव सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारी अप्लॉज एंटरटेनमेंट गत दशकभरापासून बंद पडली आहे.

अप्लॉज इंटरटेनमेंट पुन्हा एकदा सुरू करण्याची आमची योजना आहे. याकरीता नव्या कन्टेंटची निर्मिती आणि वितरणासाठी नवे दर्शक आणि नव्या बाजारपेठेत मोठी गुंतवणूक करण्यात येईल. हे कंन्टेंट सर्व प्लॅटफॉर्मवर वितरीत करण्याकरीता प्रारंभी 200 ते 300 कोटी रुपये गुंतवण्यात येणार असल्याचे आदित्य बिर्ला यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांने ऍप्लॉजकडून पहिला कार्यक्रम सादर करण्यात येईल. तर त्यानंतरच्या 18 महिन्यात 20 ते 30 कार्यक्रम सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. विशेष म्हणजे हे कार्यक्रम नेटफिल्क्स सारख्या इंटरनेट आधारीत आधुनिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची कंपनीची योजना आहे.