|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

वृत्तसंस्था /श्रीनगर :

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हे दोघे बांदीपूर जिल्हय़ातील गुरेझ सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तथापि जवानांनी त्यांना रोखले आणि त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.

या अधिकाऱयाने सांगितले, सेनादलाने या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात शोध मोहिम सुरु केली आहे. बुधवारी रात्री उशीरा सेनादलाचे एक पथक नियमित पेट्रोलिंगसाठी गुरेझ सेक्टरमधील धुमुट जंगल परिसरामध्ये गेले होते. या पथकाला तेथे हे दोन घुसखोरी करत असल्याचे दिसले. त्यांनी परत जाण्याचे आवाहन करुनही घुसखोरीचा प्रयत्न न सोडल्याने अखेर जवानांनी त्यांना ठार मारले. तर बुधवारी लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आयुब लालहेरी यालाही एन्काऊंटरमध्ये मारले होते. तर गुरुवारी आणखी दोघांना यमसदनी पाठवल्याचे या अधिकाऱयांनी सांगितले. अद्यापही या भागात शोधमोहिम सुरुच असल्याचे ते म्हणाले.

 

Related posts: