|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » नादाल, किरगॉईस विजयी, व्हेरेव्ह पराभूत

नादाल, किरगॉईस विजयी, व्हेरेव्ह पराभूत 

वृत्तसंस्था /ओहिओ :

येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सीडेड राफेल नादाल, ऑस्ट्रेलियाचा निक किरगॉईस, बल्गेरियाचा डिमिंट्रोव्ह आणि अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यांनी तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह, फ्रान्सचा गॅसकेट तसेच स्पेनचा लोपेझ यांना पराभव पत्करावा लागला.

या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढेचाल मिळालेल्या स्पेनच्या नादालने बुधवारी दुसऱया फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या गॅसकेटचा 6-3, 6-4 असा पराभव केला. नादालचा पुढील फेरीतील सामना स्पेनच्या व्हिनोलासशी होणार आहे. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या बिगर मानांकित टिफोईने जर्मनीच्या अव्वल ऍलेक्झांडर व्हेरेव्हला 4-6, 6-3, 6-4 असा पराभवाचा धक्का देत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. बल्गेरियाच्या सातव्या मानांकित डिमिंट्रोव्हने स्पेनच्या फेलिसियानो लोपेझचा 7-6 (7-5), 6-4, अर्जेंटिनाच्या 28 वर्षीय डेल पोट्रोने अमेरिकेच्या प्रुगेरचा 6-4, 6-4, ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने युक्रेनच्या डोल्गोपोलोव्हचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. स्पेनचा डेव्हिड फेरर आणि बुस्टा तसेच रशियाच्या कॅचेनोव्ह यांनी शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले आहे.

Related posts: