|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाममधील महापुरात 140 वन्यजीवांचा अंत

आसाममधील महापुरात 140 वन्यजीवांचा अंत 

वृत्तसंस्था/ काझीरंगा

आसाममध्ये लागेपाठ दुसऱयांदा आलेल्या महापुरात जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या 481 चौरस किलोमीटर भूभागापैकी 80 टक्के भाग जलमग्न झाले आहे. यामुळे 140 प्राणी मृत्यूमुखी पडले असून यात 7 गेंडय़ांचाही समावेश आहे.

ऑगस्ट 10 पासून आतापर्यंत 7 पाणगेंडे, 122 बारशिंगे, दोन हत्ती, 3 सांबर, एक म्हैस, 2 चिंकारा आणि एक सांळींदर पुरात मृत्यूमुखी पडल्याचे काझीरंगा वन विभागाचे विभागीय अधिकारी रोहीनी बल्लव सायकीया यांनी सांगितले. मृत्युमूखी पडत असलेल्या प्राण्यांची कलेवरे रोज सापडत आहेत. युनेस्कोकडून जागतीक वारसास्थळ घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्यात पाणी घुसल्याने 10 ऑगस्टपासून निम्म्याहून आधिक जंगल पाण्याखाली आहे. काझीरंगा अभयारण्याचे (केएनपी) रक्षक, विशेष कृती दल, विविध एनजीओ, जागतीक वन्यजीव संघटना आणि वन विभागाचे सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत.