|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » नारायण राणे लवकरच भाजपात ?

नारायण राणे लवकरच भाजपात ? 

ऑनलाइन टीम / मुंबई :

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चांना उधाणा आला आहे. मात्र आता हे लवकरच खरे ठरणार असल्याची शक्यता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत समजते आहे.

येत्या 27 ऑगस्टला भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱयावर आहे. त्याचवेळी नारायण राणे पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ घोषणाच बाकी असल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होण्याची चिन्हे आहेत.