|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » डिएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा : सोमय्या यांचा आरोप

डिएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा : सोमय्या यांचा आरोप 

ऑनलाइन टीम / मुंबई :

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवहायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. डीएसकेंनी 1200कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

डी.एस कुलकर्णी यांच्या डीएसे ग्रुपने 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत खासदार सोमय्यांनी तक्रार केली आहे. तसेच यासंबंधी त्यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे. डीएसकेंनी 2015 सालापासून 750 कर्मचाऱयांचा पीएफ जमा केलेले नाही. असा दावाही किरीट सोमय्या यांनी डीएकेंवर केला आहे. सोमय्यांनी याप्रकरणी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आत डिएसके यांच्यावर कारवाई होणार का? हे पहावे लागणार आहे.