|Sunday, May 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » युटय़ूब दाखविणार जगाला बेकिंग न्यूज

युटय़ूब दाखविणार जगाला बेकिंग न्यूज 

सॅन फ्रान्सिस्को

 समाजमाध्यमांवर बातम्यांचे सादरीकरण वाढण्याचा कल असताना युटय़ूबने देखील वृत्त विभागात पाऊल टाकले आहे. लवकरच युटय़ूबचे होमपेज आणि मोबाईल ऍपवर एक स्वतंत्र विभाग असेल, ज्यात जगभरातून येणाऱया ब्रेकिंग न्यूजच्या चित्रफिती दाखविल्या जातील.

तरुणाईमुळे युटय़ूबच्या वाढत्या लोकप्रियतेदरम्यान हे नवे वैशिष्टय़ नव्या पिढीच्या अत्यंत उपयोगी पडेल असे मानले जाते. हा नवा पर्याय टॅब होमपेजच्या रिकमेंडेड चॅनलच्या बाजूला उपलब्ध असेल. तर मोबाईल ऍपमध्ये याला सजेस्टेड व्हिडिओजदरम्यान स्क्रॉल करून पाहिले जाऊ शकेल. युटय़ूब केवळ मनोरंजनासाठी वापरले जाते असे नाही तर दिग्गज कंपन्या आपल्या जाहिराती देण्यासाठी देखील युटय़ूबला एक मोठे व्यासपीठ म्हणून पाहत असतात.

या अगोदर युटय़ूबने आपल्या मोबाईल ऍपमध्ये एका नव्या वैशिष्टय़ाला जोडले आहे. याद्वारे वापरकर्ते आता आपले मित्र आणि कुटुंबीयांदरम्यान इन्स्टाग्रामच्या चॅट इंटरफेससारख्या दिसणाऱया टॅबमध्ये चित्रफिती शेअर करू शकतात. यात एका प्रायव्हेट चॅटचा देखील पर्याय देण्यात आला आहे.

Related posts: