|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

शुक्र ग्रहाचे राश्यांतर कौटुंबिक जीवनात थोडे गैरसमज निर्माण करणारे आहे. कला, क्रीडा क्षेत्रात संधी हुकण्याची शक्मयता आहे. चिकाटी व कष्ट घेतले तर आपण नक्की मोठे यश प्राप्त करू शकाल. नशिबाची साथ थोडी कमी आहे, पण पुढे येणाऱया काळात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात गुरुवार व शुक्रवार शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. धंद्यात  पैशाची गुंतवणूक सावधपणे करा. नोकरीत वरि÷ांची मर्जी संपादू शकाल. आरोग्याची काळजी घ्या. शेतीच्या कामात यश मिळेल.


वृषभ

शुक्राचे राश्यांतराने प्रेमप्रकरणात यश मिळेल. थोरामोठय़ांच्या भेटीगाठी संभवतात. नातेवाईकांकडून व मित्र परिवाराकडून आपल्या प्रगतीचे कौतुक होईल. आत्मविश्वास वाढविणाऱया घटना घडतील. मंगळवार, बुधवारी नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्मयता आहे. परदेशी जाण्याची संधी आली तरी नीट चौकशी करूनच पुढचा निर्णय घ्या. पैसे देऊन काम करू नका. फसगत संभवते. नाटय़चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल. गणपतीची आराधना केली तर कामातील अडचणी कमी होतील. महिलांनी कडक उपास करताना प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे.


मिथुन

लोकांच्या हिताकरता वाद घालून स्वत:चे नुकसान होत नाही आहे ते पहा. या आठवडय़ात घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. गणेशाच्या कृपेने अनेक अडचणी लवकरच दूर होणार आहे. शेतीच्या कामातील समस्या कमी होतील. आपले विचार मनोगत, राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव वाढविणार आहे. धंद्यात विजयश्री खेचून आणू शकाल. पैशात वाढ होईल. शेअर्स, उलाढालीत फायदा संभवतो. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रॉपर्टीच्या खरेदीविक्रीत फसवणूक संभवते. स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केल्यास जास्त फायदा होईल.


कर्क

शुक्राचे राश्यांतर नाटय़, चित्रपट क्षेत्रातील क्यक्तींना नवीन संधी मिळून देणारे असणार आहे. पैशाची चणचण कमी होईल. नोकरीत वरि÷ आपल्या कामावर खूष होतील. कौतुक करतील, प्रवासाचे बेत आखले जातील. सणाच्या निमित्ताने नवीन ओळखी होतील. ज्यातून नवीन योजना कल्पना सुचतील. धंद्यात योग्य निर्णय व विचारवंतांच्या सल्ल्याने वागल्यास मोठा फायदा संभवतो. आयुष्यात मोठी उडी घेण्याचे स्वप्न जरी असले तरी ते प्रत्यक्षात उतरवणे तितकेच कठीण आहे. ग्रहांची साथ आहे पण त्या जोडीला कष्ट घेण्याची तयारी सुद्धा हवी. वाहन जपून चालवा.


सिंह

क्षुल्लक कारणावरून वाद गैरसमज होतील. घरातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्या. आठवडय़ाच्या सुरुवातीला कामाचा व्याप जास्त असणार आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. शेतीच्या कामात तेवढेच लक्ष द्यावे लागणार आहे. जेवढे आपण इतर गोष्टीत देतो. वेळ उगाच वाया घालवू नका. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चांगली संधी मिळेल. आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थी वर्गाने थोडे कष्ट घेतले तर विजयश्री खेचून आणू शकतील. राजकीय, व सामाजिक क्षेत्रात शत्रुपक्षावर चांगलाच क्षेपणास्त्राचा मारा करू शकाल. गणपतीची आराधना फलदायी ठरेल.


कन्या

खाण्यापिण्याच्या व्यवसायात फायदा संभवतो. मात्र उधारीवर धंदा करू नका. आठवडय़ाची सुरुवात उत्साह वाढविणारी असणार आहे. नवीन कामांना गती मिळेल. मंगळवार, बुधवार नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने घरातील कामे पूर्ण कशी करायची याची चिंता लागून राहील. ईश्वराचे नामस्मरण करा व आध्यात्मिक शक्ती वाढवा. त्यामुळे आयुष्यातील काही प्रश्न सुटतील. उत्सवात, गर्दीत खिसा पाकीट सांभाळा. आपल्या वस्तुंची काळजी घ्या. शेतीच्या कामात नवीन तंत्रज्ञानाची भर टाकून उत्पादन कशाप्रकारे वाढविता येईल याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याची काळजी घ्या.


तुळ

साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पण तरीही हा आठवडा आनंदी जाणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्मयता आहे. राजकीय क्षेत्रात खोटे आरोप झाले असल्यास ते दूर होतील. गणेशाची मनोभावे भक्ती केल्यास संकटे दूर जाणार आहेत. शुक्राचे राश्यांतर प्रियव्यक्तीबरोबर संबंध सुधारण्यास मदत करेल. गुरुवार, शुक्रवार कामाचा व्याप वाढेल. घरातील व्यक्तींना पाहुण्यांची उठबस करावी लागेल. शेतीच्या कामात थोडे दुर्लक्ष होईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्या. कडक उपवास करू नका.


वृश्चिक

शुक्राचे राश्यांतर तुम्हाला लाभदायक ठरेल. श्री गणेशाच्या आगमनाची तयारी लवकरच सुरू करा. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. संसारातील समस्या मार्गी लागल्याने मनावरील ताण हलका होईल. ऋषीपंचमीला धावपळ जास्त होईल. ताण वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. कौटुंबिक सौख्य मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.


धनु

कर्क राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी वाढतील. घरातील कामे करताना दुखापत संभवते. काळजी घ्या. प्रवासात घाई नको. धंद्यात खर्च होईल व फायदाही वाढेल. खाण्यापिण्याची हयगय करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात कामाचा व्याप वाढेल. संताप वाढू शकतो. आप्तेष्ट, मित्र यांच्या संबंधी समस्या येऊ शकतात. शेजारी त्रस्त करतील. मदत करावी लागेल. जवळच्या व्यक्तींचा दुरावा संभवतो.


मकर

कर्क राशीत शुक्र प्रवेश झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. दुसऱयाला मदत करताना कायद्याचे उल्लंघन होऊ देऊ नका. मंगळवार, बुधवार, राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. वाद वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. टिका होईल. नोकरीत तुमच्या कामाचे श्रेय दुसऱयाला मिळेल. संसारात सुख शोधता येईल. घरातील माणसे तुमच्या पाठीशी राहतील. मुले व जीवनसाथी यांना दुखवू नका. कोर्टाच्या कामात सावध रहा. धोका टाळा.


कुंभ

या आठवडय़ात धावपळ वाढेल. गैरसमज आपसात होतील. प्रकृतीची काळजी घ्या. थकवा जाणवेल. घरात क्षुल्लक मतभेद होतील. खर्चाचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढेल. कर्क राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. श्रीगणेश पुजनानंतर थोडे वातावरण ठीक  होईल. ऋषी पंचमीच्या दिवशी मान, प्रति÷ा मिळेल. राजकीय सामाजिक कार्यात तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकेल. प्रगतीची संधी मिळेल. कोर्टाच्या कामात साक्षीदाराकडून मनस्ताप संभवतो. धंद्यात कामगारांना टिकवून ठेवा. प्रवासात घाई नको.


मीन

कर्क राशीत शुक्राचे राश्यांतर जमिनीच्या व्यवहारात फायदेशीर ठरू शकते. थकबाकी लवकर वसूल करा. अरेरावी कुठेही करू नका. अपशब्दाचा वापर केल्याने अडचणी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. कला साहित्यात चमकाल. पोटाचा त्रास संभवतो. जेवणाची वेळ सांभाळा. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय होतील. दुसऱयाला शब्द देताना विचार करा. कोर्टकेसमध्ये मुद्देसूदच बोला.

Related posts: