|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले

वाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले 

प्रतिनिधी/ सोलापूर

वाळु व्यवसायामध्ये भागीदार करून घेतो म्हणून आगाऊ पैसे घेऊन एकाला 11 लाख रूपयांना फसविले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. विक्रांत श्रीकांत पाटील (रा. जुनी लक्ष्मी चाळ, डोणगांव रोड) असे फसविलेल्या आरोपीचे नाव आहे. मुगेश दिगंबर जगताप (वय 27) याने फिर्याद दिली आहे.

विक्रांत आणि मुगेश जगताप हे दोघे मित्र आहेत. विक्रांत याने मुगेश जगताप आणि दिपक गुमटे यांना विश्वासात घेऊन वाळू व्यवसायामध्ये मोठा नफा मिळतो. तुम्ही पैसे गुंतविल्यास दोघांनाही टक्केवारी देतो असे सांगितले. त्यामुळे हे दोघे भागीदार होण्यासाठी 17 लाख रूपये दिले. हे पैसे वाळू व्यवसायामध्ये न गुंतविता आरोपीने स्वतःच पैसे वापरला. याबाबत फिर्यादीने विचारपूस केले असता आरोपीने केवळ सहा लाख रूपये परत केले.

शिल्लक रक्कमेबाबत विचारले असता पैसे देण्यास टाळाटाळ केला. त्यानंतर सतत पाठपुरावा करूनही उर्वरित पैसे न दिल्याने आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

Related posts: