|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वानरांच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

वानरांच्या हल्ल्यात वृद्ध जखमी 

वार्ताहर/ पाटपन्हाळा

माळापुडे  (ता शाहूवाडी) येथील वैरणीसाठी गेलेले शेतकरी  श्रीपती गणपती वडिगेकर (60) हे वानरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

 याबाबत समजलेली माहिती अशी का,r श्रीपती वडिगेकर हे शनिवारी 19 दुपारच्या सुमारास आपटय़ाचा माळ येथे जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. दरम्यान अंधार पडला तरी श्रीपती वडिगेकर घरी परत न आल्याने नातेवाईक शोध घेण्यासाठी शेतात आले असता वडिगेकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायाचे लचके कोल्हा तोडत असल्याचे दिसले. ग्रामस्थांनी कोह्यास हुसकावून वडिगेकर यांना गावातील खासगी डॉक्टरकडे  आणले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यावर ते शुध्दीत आले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सांगितले की, वैरण कापत असताना माझ्यावर वानराच्या कळपांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मला प्रतिकार करण्यास वेळ मिळाला नाही व मी बेशुद्ध झालो.

   दरम्यान  वडिगेकर हे गंभीर जखमी  असल्याने गावातील डॉक्टरांनी त्यांच्यावर  पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले.

Related posts: