|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तल अफारवर कब्जासाठी इराकने सुरू केली मोहीम

तल अफारवर कब्जासाठी इराकने सुरू केली मोहीम 

बगदाद

 : इराकच्या सैन्याने तल अफार शहराला इस्लामिक स्टेटच्या तावडीतून सोडविण्यासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी म्हणाले. दहशतवाद्यांनी समर्पण करावे अन्यथा मरणासाठी तयार रहावे. ही मोहीम तल अफार स्वतंत्र करविण्यासाठी असून इराक सैन्यासोबत पूर्ण जग उभे असल्याचे त्यांनी म्हटले. मोहिमेच्या पार्श्वभूमीवर इराकच्या लढाऊ विमानांनी बॉम्बफेक चालविली आहे. तल अफार शहराला दक्षिणेत इराकचे सैन्य आणि शिया हल्लेखोरांनी घेरले असून उत्तरेकडून कुर्दिश पेशमर्गा फायटर्सनी घेराव घातला. अमेरिका आणि इराकच्या सैन्यानुसार या शहरात जवळपास 2 हजार दहशतवादी आहेत. मोसूलपासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित तल अफार शिया मुस्लीम लोकसंख्येचे शहर आहे. परंतु दीर्घकाळापासून ते कट्टरपंथी सुन्नी बंडखोरांच्या ताब्यात आहे.