|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नेसरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधासाठी एक पाऊल पुढे

नेसरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधासाठी एक पाऊल पुढे 

वार्ताहर/ नेसरी

नेसरी ग्रामपंचायत बिनविरोधासाठी रविवारी बैठक पार पडली. पक्ष प्रतिनिधी यांच्यात एकमत होवून राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांना प्रत्येकी 5 जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरपंच पदासाठी बुधवारी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता बैठक होवून बिनविरोध कमिटीकडून अंतिंम निर्णय घेण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

रविवारी सकाळी व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालयात मागील झालेल्या बिनविरोध कमिटीच्या निर्णयानुसार सदस्यांची आज रविवारी दुपारी 12 वाजता बैठक पार पडली. यावेळी बिनविरोधासाठी प्रयत्न करणारे निमंत्रक कृष्णराव रेडेकर यांनी स्वागत करून सर्वानुमते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव हिडदुगी यांचे नाव सुचविले. याला सर्वांनी पाठिंबा दिला. यानंतर बिनविरोधच्या बैठकीला सुरवात झाली. मसणाई मंदिरात झालेल्या गामस्थांच्या मागील बैठकीत बिनविरेध कमिटी गठीत करण्यात आली होती. त्या कमिटीची बैठक झाली. यावेळी कृष्णराव रेडेकर यांनी गावात लक्ष्मी यात्रा व पाणी योजनेचा प्रश्न लक्षात घेता बिनविरोध होणे गरजेचे असल्याचे मत मांडले व त्यादृष्टीने पावले उचलली असल्याचे सांगत स्वागत केले. यानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नाईक बोलताना म्हणाले, बिनविरोधची संकल्पना योग्य असून त्यानिमित्त गावातील हेवेदावे रहाणार नाहीत. निवडणूक बिनविरोध करून गाव एकोप्याने ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजेत. ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव म्हणाले, गावच्या विकासासाठी एकत्र येऊन रेंगाळलेली कामे केली पाहिजेत. यासाठी आपला पाठिंबा असून गाव एकत्र येण्यासाठीची धडपड योग्य असून निवडणूक बिनविरोध करून सर्व स्तरावर निधी उपलब्ध होऊन गावाला पुढे नेता येईल. त्यादृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जोतिबा भिकले म्हणाले, आमचा पक्ष गावाबरोबर रहाणार असून गावच्या विकासात नेहमीच साथ असणार आहे. यामुळे गावचा विकास आणि लक्ष्मी यात्रा डोळय़ासमोर ठेऊन बिनविरोध सक्षम पर्याय असल्याचे सांगितले. यानंतर अन्य काही जणांनी मत व्यक्त केले.

यानंतर निवडणूक बिनविरोध करायचे हे नक्की असून याबाबत निकष व धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे बोलून गावातील प्रमुख दावेदार पक्षांची नावे जाहीर करून ज्या-त्या पक्ष प्रमुखांनी 15 सदस्यांपैकी आपल्याला किती सदस्य देण्यात यावेत याबाबत मागणी करण्याच ठरले. याप्रमाणे राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी प्रमुख दावेदारीची मागणी करत प्रत्येकी 5 प्रमाणे जागांची मागणी केली. त्याप्रमाणे सर्वांत एकमत होऊन या तिनही पक्षांना प्रत्येकी पाच जागा देण्याचे ठरले. यानंतर सरपंच पदाच्या नावाची चर्चा होऊन हे पद कुणाकडे द्यायचे यावरून जोरदार चर्चा झाली. यावर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी यावर आपला हक्क बजावला. यावर चर्चा होत याबाबत अंतीम निर्णय बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजता कमिटीच्या बैठकीत पक्ष प्रमुखांच्या समवेत घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी ज्या पक्षाचा सरपंच होईल तो पाच वर्षे सत्तेवर राहील. उरलेल्या दोन पक्षातील सदस्यांना उपसरपंचपद प्रथम मिळेल त्याला दोन वर्षे व नंतर मिळेल त्याला तीन वर्षे असे ठरविण्यात आले. यावेळी मज्जिद वाटंगी, ऍड. संदीप फगरे, महादेव साखरे, भिकाजी दळवी, कार्तिक कोलेकर, सयाजी शिंदे, प्रकाश कोरी, मल्लिकार्जुन तेली, संभाजी कांबळे, गोपाळ परीट आदी उपस्थित होते.

Related posts: