|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टेरव सरपंच भाग्यलक्ष्मी मोरे अपात्र

टेरव सरपंच भाग्यलक्ष्मी मोरे अपात्र 

स्मशानशेड कामाचा धनादेश पतीच्या नावे, लोकशाही दिनातील तक्रारीनंतर निर्णय

प्रतिनिधी /चिपळूण

जनसुविधा योजनेंतर्गत टेरव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या स्मशान शेड बांधकामाचा ठेका नातेवाईकांना देतानाच धनादेश पत्नीच्या नावे काढल्याप्रकरणी लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीनुसार झालेल्या चौकशीत दोषी आढळल्याने सरपंच भाग्यलक्ष्मी मोरे यांना जिल्हाधिकाऱयांनी अपात्र ठरवले आहे.

टेरव येथील कुंभारवाडी, तांदळेवाडी येथे 2 लाख 54 हजार रूपये खर्चाची स्मशान शेड बांधण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया न करता आणि त्यासाठी आलेल्या अर्जांचा विचार न करता सरपंच मोरे यांनी आपले पती भरत मोरे यांना ते काम दिले. त्याचा धनादेशही त्यांच्या नावे काढण्यात आला. याप्रकरणी एकनाथ माळी यांच्यासह किशोर कदम यांनीही लोकशाही दिनात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी चौकशी होऊन त्यामध्ये मोरे या देषी आढळल्याने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मोरे यांना अपात्र केले असल्याची माहिती सोमवारी तक्रारदार कदम यांनी पत्रकारांना दिली. यावेळी उपसरपंच राजेश वास्कर उपस्थित होते.