|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘ग्रंथालये सांस्कृतिक व्यवहारांची पेंद्र व्हावीत’

‘ग्रंथालये सांस्कृतिक व्यवहारांची पेंद्र व्हावीत’ 

 चरित्र लेखक वि. श्री. जोशी संदर्भ ग्रंथ संग्रहालय  नामकरण सोहळा

मुंबई / प्रतिनिधी

सर्व जात, पंथ आणि विचारांच्या व्यक्तींना जोडणारी ग्रंथालये ही आजच्या काळात सांस्कृतिक व्यवहारांची पेंद्र व्हावीत, माणसे बदलण्याची शक्ती ग्रंथालयांमध्ये असून त्या अनुषंगानेच कार्य व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय निवड समिती अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली.

रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ग्रंथालयाचे क्रांतिकारकाचे चरित्र लेखक वि. श्री. जोशी संदर्भ ग्रंथ संग्रहालय, असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्मारकाच्या मादाम कामा सभागफहात झालेल्या सोहळ्यात कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, अनुराधा खोत, सुमेधा मराठे आदी मान्यवर, वि. श्री. जोशी यांचे बंधू प्रभाकर जोशी, चिरंजीव चंद्रशेखर जोशी, पुतणे अभय जोशी, स्नुषा आणि नातवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या निरनिराळ्या भागात विखुरलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याचा आढावा घेण्याचे कार्य अद्याप अपूर्ण आहे, इतिहास हा जिवंत माणसांच्या जिवंत कृतीने साकारलेली गोष्ट आहे. तो सर्व घटनांना आपल्या कवेत घेत असतो. वि. श्री. जोशी यांनी वेगवेगळ्या क्रांतिकारी घटना लिहून फार मोठा ठेवा आपल्याला दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले हे कार्य विशेष आहे, असेही अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले.

याप्रसंगी अरुणा ढेरे यांच्या हस्ते मंदाकिनी भट लिखित सावरकर परिचय, स्वातंत्र्यकवी गोविंद, सावरकरांचे समाजकारण, अनुराधा खोत लिखित भाषाशुद्धी, सावरकर विचार, अंदमान पर्व, नेपाळी आंदोलन तसेच सुमेधा मराठे लिखित सावरकरांच्या आठवणी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

वि. श्री. जोशी हे अनेक वर्षे स्मारकाच्या समितीवर कार्यरत होते. त्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास लिहिताना जमविलेले दुर्मिळ साहित्य स्मारकाला देऊन ग्रंथलाय अधिक समफद्ध केले आहे. संशोधनात्मक लिखाणातून त्यांनी लिहिलेला इतिहास हा भावी पिढीसाठी अनमोल ठेवा आहे, असे विचार स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.

फोटो ओळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ग्रंथालयाचे क्रांतिकारकाचे चरित्र लेखक वि. श्री. जोशी संदर्भ ग्रंथ संग्रहालय, असे नामकरण ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.