|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » तामिळनाडू राजकारण ; दिनकरन समर्थकांनी सरकारचा पाठिंबा काढला

तामिळनाडू राजकारण ; दिनकरन समर्थकांनी सरकारचा पाठिंबा काढला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम या दोन्ही गटांचे मनोमीलन झाल्याने अण्णा द्रमुकमधील संघर्ष संपला असे वाटत होते. मात्र, पक्षाचे उपमहासचिव टीटीव्ही दिनकरन यांच्या समर्थकांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे आज सांगितले. यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यात आली.

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत कलह निर्माण झाला होता. तसेच मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या ओ. पनीरसेल्वम यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. या सर्व राजकीय घडामोडींनंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय मतभेद होते. मात्र, हे दोन्ही गट आता एकत्र आले असून, पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, आता दिनकरन समर्थकांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

Related posts: