|Friday, January 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » लालबागच्या राजाचे बदलते रूप

लालबागच्या राजाचे बदलते रूप 

ऑनलाइन टीम / मुंबई :

येत्या 25 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याने महाराष्ट्राचे आराद्य दैवात गणरायाचे आगमन होणार आहे. घरा-घरात तसेच बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळाद्वारा गणपतीची स्थापना केली जाते. गणेशोत्सवात सर्व जाती – धर्माचे लोक सहभागी होतात. या उत्सवात सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे ‘लालबागचा राजा’ची. या बाप्पाचे बदले रूप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईमधील सार्वजनिक गणपती आहे. लालबागच्या राजाची स्थापना इ.स, 1934साली करण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बांधवांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघडय़ावर भरणारा बाजार 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला.तत्कालीन नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए.राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. 1934मध्ये होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रूपयात ‘श्री’ची स्थापना झाली. येथुनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’म्हणुन श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली आहे.

 

पहा लालबागच्या राजाचे दुर्मिळ फोटो

 

Related posts: