|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात : सहकारमंत्री

1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात : सहकारमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. कर्जमाफीसाठी उपसमितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

शेतकऱयांना कर्जमाफी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज पार पडली. त्यानंतर देशमुख यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, 22 ऑगस्टपर्यंत 22 लाख 40 हजार 943 शेतकऱयांची नोंदणी झाली आहे. तसेच 18 लाख 85 हजार 457 शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Related posts: