|Friday, November 16, 2018
You are here: Home » leadingnews » राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला संघातील धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱया खेळाडूंचा दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला जातो. मागील चार वर्षांच्या काळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया खेळाडूंना राजीव गांधी पुरस्काराने तर सलग चार वर्षे खेळात सर्वोत्त्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाते. याशिवाय विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाला द्रोणाचार्य आणि खेळाच्या विकासासाठी आयुष्यभर योगदान देणाऱयांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो.

दरम्यान, या सर्व खेळाडूंना 29 ऑगस्टला राष्ट्रपती भवनात होणाऱया विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

Related posts: