|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जैन महिला परिषदेच्या पॅन्सरपूर्व तपासणीस उत्तम प्रतिसाद

जैन महिला परिषदेच्या पॅन्सरपूर्व तपासणीस उत्तम प्रतिसाद 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेमार्फत शरद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महिलांसाठीच्या मोफत स्तन आणि गर्भाशय मुखाच्या पॅन्सरपूर्व निदान तपासणी शिबिरामध्ये तब्बल 3004 महिलांची तपासणी करण्यात आली. सांगली, कोल्हापूर जिह्यास बेळगांव व कर्नाटक सीमा भागातील शेकडो गावातून महिलांनी सहभाग नोंदविला. जगभरामध्ये पॅपस्मिअर चाचणीसाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात म†िहलांचा सहभाग ही विक्रमी संख्या आहे.

दरम्यान सकाळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगांवकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. बोरगांवकर म्हणाले, टाळता येण्यसारख्या पॅन्सर असूनही अज्ञानामुळे ग्रामीण भागामध्ये हा पॅन्सर जास्त आढळतो. पॅन्सरची भीती लोकांना उपचार घेण्यापासून आणि त्याची तपासणी करण्यापासून परावृत्त करतात. या दोन मुद्यांना लक्षात घेवून दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेने हा समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे.

आवाडे म्हणाले, जैन महिला परिषदेचा हा उपक्रम म्हणजे पॅन्सरपूर्व तपासणीची जागृती आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होत आहे. तपासणीसाठी मिळणारा प्रतिसादावरून हे शिबिर विश्वविक्रमी ठरेल.

शरद इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डी. ए. पाटील, चेअरमन सागर चौगुले, व्हा.चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, लठ्ठेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, माजी महापौर सुरेश पाटील, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे, सौ. मीना पाटील, सौ. पद्मीनी चकोते, सौ. नितू पाटील-यड्रावकर, सौ. किशोरी आवाडे, संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

†िदवसभरामध्ये गर्भाशय मुख (पॅपटेस्ट), स्तन व तोंडाच्या पॅन्सरची तपासणी करण्यात आले. सकाळी 9 वाजल्यापासून गावागावातून महिलांची तपासणीसाठी गर्दी झाली. दिवसभर महिलांचा ओघ सुरू होता. एवढय़ा मोठय़ा संख्येने महिला आल्या तरी योग्य व काटेकोर नियोजनामुळे तपासणी व्यवस्थीत झाली. तसेच प्रत्येक महिलेसाठी स्वतंत्र अशा 55 कक्ष करण्यात आल्या होत्या. प्रत्येकासाठी डिस्पोजल, निर्जतुकीकरण केलेल्या साहित्याचा वापर केले. तसेच पॅन्सर तपासणी व उपचार याविषयी जागृती होण्यासाठी चित्रफित पाहण्याची सोय करण्यात आली होती. स्त्रियांचे पॅन्सरतज्ञ डॉ. अनिल मगदूम, डॉ. अनिल तकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर, मुंबई, पुणे, कराड, कोल्हापूर, सांगली येथील 70 पेक्षा अधिक स्त्रिरोग तज्ञ, 200 पेक्षा अधिक परिचारिका, 100 इतर डॉक्टर्स, 500 पेक्षा अधिक स्वंयसेवक परिश्रम करीत होते.

या उपक्रमामध्ये शरद इन्स्टिटय़ूट, अरिहंत पेडीट, ठाणे असोसिएशन ऑफ ऑबस्टेक्टीस ऍण्ड गायनाकॉलॉजीस्ट, मुंबई,  गणेश बेकरी, कोल्हापूर व सांगली जिह्यातील केमिस्ट असोसिएशन, डी. वाय. पाटील कॉलेज आणि हॉस्पिटल, विष्णू आण्णा पाटील नर्सिंग स्कूल, कोल्हापूर पॅन्सर सेंटर, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, ऱहदया पॅन्सर हॉस्पिटल, यशोमंगल हॉस्पिटल, महात्मा गांधी पॅन्सर हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल, लक्ष्मीप्रभा नर्सिंग इन्स्टिटय़ूट, गुलाबराव पाटील शिक्षण संकुल, कृष्णा डायग्रोस्टिक पुणे या संस्थांचा सहभाग होता. तसेच महिलांसाठी बारामतीच्या चंदुकाका सराफ यांनी पाणी, फळांची तर गणेश बेकरीने नाष्टय़ाची सोय केली होती.

यावेळी परिसरातील तज्ञ डॉक्टरर्स, पॅथॉलॉजी यांच्यासह राजेंद्र झेले, दादा पाटील, शांतीनाथ नंदगावे, पंचायत समितीच्या सदस्या मिनाक्षी कुरडे, नगरसेविका संगीता पाटील-चिंचवाडकर, दिपा झेले, प्रेमला मुरगुंडे, संभाजी मोरे, महेश कलगुटगी, दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ. चांदणी आरवाडे, उपाध्यक्षा सौ. स्वरूपा पाटील-यड्रावकर, सचिव सौ. मीना घोदे, सौ. नूतन जनाज, श्रीमती अनुपमा मुळे, अनिता पाटील, डॉ. भारती डिग्रजे यांच्यासह जैन महिला परिषदेच्या सर्व सदस्या यांनी शिबिराचे नियोजन केले. शरद इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

पॅपटेस्ट संख्याचे विश्वविक्रम

ह्या चाचणीसाठी बहुतांश महिला पुढे येत नाहीत. शिबिरासारख्या सार्वजनिक ठिकाणी तर खूपच कमी प्रतिसाद मिळतो. मात्र महिला परिषदेच्या या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यापूर्वी 1155 महिलांच्या तपासणीचे रेकॉर्ड आहे. मात्र येथे तब्बल 3004 महिलांची तपासणी म्हणजे विश्वविक्रम घडला आहे.

Related posts: