|Thursday, July 18, 2019
You are here: Home » विविधा » आरबीआयकडून लवकरच 200 रूपयांची नवी नोट चलनात

आरबीआयकडून लवकरच 200 रूपयांची नवी नोट चलनात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

भारतीय रिझर्व्ह बँकेने 50 रूपये नंतर आता 200 रूपयांची नोट जारी करणार असल्याचे सांगितले आहे. आरबीआय प्रथमच 200 रूपयांचे नोट जारी करत आहे. यासंदर्भात अर्थमंत्रालयाने बुधवारी अधिसुचना जारी केली आहे.

आरबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 आणि 500 रूपयांच्या नोटांच्या दरम्यान एकही नोट चलनात नाही. त्यामुळे 200 रूपयांची नोट बजारात आल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. आरबीआय बाजारात मोठय़ा नोटांऐवजी छोटय़ा नोटांचा वाटा वाढण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरबीआय सप्टेंबरमध्ये 200 रूपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.