|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा राजीनामा ; पंतप्रधानांचा स्वीकारण्यास नकार

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा राजीनामा ; पंतप्रधानांचा स्वीकारण्यास नकार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वारंवार होत असलेल्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे. मात्र, मोदींनी अद्याप हा राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आठवडाभरात सलग दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांच्यावर टीका होत होती. बुधवारी पहाटे उत्तर प्रदेशातील औरेया जिह्यात कैफियत एक्सप्रेस रूळावरून घसरली. एक्सप्रेसने डंपरला धडक दिली आणि यानंतर एक्सप्रेसचे दहा डबे रूळावरून घसरले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच मागील आठवडय़ात शनिवारी उत्तर प्रदेशमध्येच मुजफ्फरनगरमध्ये उत्कल एक्सप्रेसला अपघात झाला होता. उत्कल एक्सप्रेसचे डबेही रूळावरून घसरले आणि यात सुमारे 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या चार दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. अखेर आज त्यांनी आपला राजीनामा मोदींकडे सोपवला आहे. मात्र, मोदींनी तो स्वीकारला नसल्याची माहिती मिळत आहे.