|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दुचाकी चोरटय़ास अटक, 3 दुचाकी ताब्यात

दुचाकी चोरटय़ास अटक, 3 दुचाकी ताब्यात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी सराईत चोरटय़ास अटक करून त्याच्याकडून 3 दुचाकी जप्त केल्या. सुशांत तानाजी नांगोळे (वय 23 रा. रांगोळे गल्ली, लिंगनूर ता. कागल) असे त्याचे नाव आहे. त्याने शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

            महावीर कॉलेज, नागाळा पार्क परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक तरुण नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन जाताना शाहूपुरी पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने स्टेशन रोड परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून चौकशी केली असता गोकुळशिरगाव, लक्ष्मीपुरी येथून अन्य दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक पवार, संदीप जाधव, नीलेश साळुखे, प्रशांत पांडव, शशिकांत पोरे, ऋषिकेश ठाणेकर, समीर मुल्ला, प्रशांत घोलप, राजेश बरगाले, विशाल चौगले यांनी ही कारवाई केली.