|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आज पालिकेची सभा होणार वादळी

आज पालिकेची सभा होणार वादळी 

प्रतिनिधी/ सातारा

पालिकेची सर्वधारण सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी पालिकेच्या सभागृहात होत असून सातारा विकास आघाडीकडून सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आलेले 22 विषय मंजूर करण्यासाठी रणनिती आखली आहे. त्यामुळे कितीही विरोध केला तरीही हे विषय मंजूर होणार आहेत. दरम्यान, ऐनवेळच्या विषयावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  बुधवारी बांधकाम समितीची सभा झाली असून ती सर्वसाधारण सभेची रंगीत तालिमच झाल्याचे बोलले जात आहे.

सातारा विकास आघाडीकडे सत्ता असल्याने नगराध्यक्षा कदम यांनी या सर्वसाधारण सभेसाठी परिपूर्ण नियोजन केले असून विरोधकांनी कोंडीत पकडण्यासाठीही अभ्यास केला आहे. त्यामुळे विषयपत्रिकेवर असलेल्या विषयामध्ये  प्रभाग 20 मधील समर्थ मंदिर ते धस कॉलनी या रस्त्यावरील खारी विहिरीकडे जाणाऱया चौकास जय महाराष्ट्र चौक असे नामकरण करण्यात यावे, प्रभाग 5 मधील चिमणपुरा पेठेतील सिटी सर्व्हे नं. 11 अ येथे मेडिटेशन हॉल बांधण्याच्या कामाचे 31 लाख 54 हजार 666 रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्याचा निर्णय घेणे, सदरबझारमधील सिटी सर्व्हे नं. 63 ही जागा पालिकेकडे वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याकामी कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करुन निर्णय घेणे. तसेच शिवाजी संग्रहालय चौकात नवीन सिग्नल बसविण्यासाठी न्यूकिलऑनिक्स सोल्यूशन प्रा. लि. पुणे यांच्या अंदाजपत्रकीय 6 लाख 90 हजार 706 पेक्का 2.54 टक्के कमी आलेल्या दरास मंजूरी देण्याचा निर्णय घेणे, शहरातील विविध ठिकाणी सेमी हायमास्ट दिवे बसवण्याकामी 40 लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्याबाबत निर्णय घेणे, स्ट्रीट लाईट मेंटेनन्स हे काम करणाऱया शरद विनायक इलेक्ट्रीकल्स यांना 2016-17 च्या दराने काम करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेणे, पालिका इमारतीचा विद्युत मेंटेनन्स करण्याकामी वरद विनायक इलेक्ट्रीक यांना 2016-17 च्या दराने काम करण्यात मुदतवाढ देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंध व अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 3 टक्के निधीतून कार्यान्वित करावयाच्या योजनांबाबत निर्णय घेणे, पालिका हद्दीत प्रायोगिक तत्वावर व नंतर पे ऍण्ड पार्किंग व्यवस्था करण्याबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर निर्णय घेणे, पालिकेच्या उर्दू शाळेत 8 वीचा वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेणे, पालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये सेमी इंग्लिश व प्ले ग्रुप शिक्षिका व सेविका ठेका पद्धतीने नेमण्याबाबत निर्णय घेणे, माऊंट मनास्लू गिर्यारोहण मोहिमेतील गिर्यारोहक आशिष माने यास आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेणे, प्रभाग 5 मधील सिटी सर्व्हे न. 185 येथील ओढय़ालगत संरक्षक भिंत बांधण्याकामी सर्वात कमी दराबाबत निर्णय घेणे, 201-17 च्या वार्षिक लेख्यास मंजूरी देण्याबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करुन निर्णय घेणे, पालिकेच्या मुख्य कार्यालयात व पालिकेच्या इतर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यावर निर्णय घेणे, गेंडामाळ नाका येथील उद्यानास श्रीमंत छत्रपती संभाजीराजे उद्यान असे नामकरण करण्याचा निर्णय घेणे, पोवई नाका येथील शिवाजी सर्कलचे नाव बदलून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असे करण्याबबात निर्णय घेणे, पावर हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराला श्रींमत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज भोसले असे नामकरण करणे तसेच जकातवाडी फिल्ट्ररेशन येथील कमानीस कै. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज भोसले असे नामकरण करण्याचा निर्णय घेणे, असे 22 विषय घेण्यात आले आहेत.