|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » पेप्सीको : कोका-कोलाला जबर फटका

पेप्सीको : कोका-कोलाला जबर फटका 

नवी दिल्ली :

भारतीय ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्य क्रमतेमुळे शर्करायुक्त कार्बोनेटेड पेय उद्योग आपल्या आतापर्यंतच्या वाढीच्या सर्वाधिक मंदीच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे कोका कोला आणि पेप्सीकोचे शर्करायुक्त कार्बेनेटेड पेय निर्मिती प्रकल्प आपल्या क्षमतेच्या निम्म्यावर कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

या कंपनीच्या प्रकल्पातील कार्बनयुक्त सौम्य पेय निर्मिती विभाग आपल्या उत्पादन क्षमतेच्या निम्मे किंवा 40 टक्क्मयांवर कार्यरत आहेत. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी या ‘ऑफ सिझन’मध्येच असे घडत होते. मात्र आता मे व जूनसहीत संपूर्ण वर्षभर या कंपन्या क्षमतेच्या निम्म्याहून खाली निर्मिती करत असल्याचे औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी म्हटले आहे.

शर्करायुक्त आरोग्यदायी पेयांकडे भारतीय ग्राहकांचे वाढते कल आणि अन्य स्वदेशी कंपन्यांचा उदय हे सलग सात तिमाहीतील घसरत्या वृद्धीचे कारण मानले जात आहे. त्यातच नव्याने लागू झालेल्या करव्यवस्थेत कार्बनयुक्त शीतपेयावर सरकारने 40 टक्के अधिभार लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे पेप्सीको आणि कोका कोला या दिग्गज जागतिक कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

Related posts: