|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पारगाव चौकात एटीएम मशिन फोड़ न्याचा प्रयत्न फसला

पारगाव चौकात एटीएम मशिन फोड़ न्याचा प्रयत्न फसला 

प्रतिनिधी /खंडाळा :

पुणे बंगलोर महामार्गालगत असणाया पारगांव येथे बुधवारी रात्री शहिद सुनिल यादव चौकातील एटीएम फोडून पैसे चोरण्याचा अज्ञात  चोरटय़ांचा प्रयत्न फसला. मात्र चोरटय़ांनी मशीनचे मोठया प्रमाणात नुकसान केले असून रक्कम सुरक्षित आहे.

 पारगांव खंडाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून पैसे चोरण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटय़ाने एटीएम मशीन फोडले . बुधवारी रात्री साडेबारा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला . मात्र चोरटयांना मशीनमधील पैसे काढता आले नाहीत . एटीएम मशीनच्या वायर तोडून मशीन उचकटून पैसे चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.     

  एटीएम असलेल्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत व पहाटे चार नंतर नेहमी वर्दळ असते. या चौकात चोरीचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे . बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये रक्कम ठेवण्यात आली होती . मात्र काही तरी बिघाड झाल्याने ग्राहकांना पैसे काढता येत नसल्याने रात्री आठच्या सुमारास संबंधित एजन्सीने मशीनमधील बिघाड दूर करण्याचा प्रयत्न केला होता . या मशीनमधून अनेक कंपनी कामगार , सरकारी कर्मचारी , शेतकरी , विद्यार्थी नियमितपणे पैसे काढत असतात . त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते . गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला . स्टेट बँकेचे अधिकारी , खंडाळा पोलीस व मशिनमध्ये पैसे भरणाया एजन्सीचे कर्मचारी यांनी एटीएम मशीनची पाहणी केली .  चोरटय़ांनी मशिनचे नुकसान करून पैसे चोरण्याचा प्रयत्न फसला असून रक्कम सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले . याबाबत खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे .

Related posts: