|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बावडेकर, केळकरांचे नगरसेवकपद कायम

बावडेकर, केळकरांचे नगरसेवकपद कायम 

प्रतिनिधी /सांगली :

पक्षविरोधी भूमिका घेतलेले आणि भाजपावासी झालेले नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेविका स्वरदा केळकर यांचे सदस्यत्व अपात्र करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी विकास आघाडीचे तत्कालीन गटनेते नगरसेवक शिवराज बोळाज यांनी  विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला. असे लेखी पत्र मनपा व स्वतःला आयुक्त कार्यालयांकडून मिळाले असल्याची माहिती, नगरसेवक बावडेकर, केळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे भाजपाला दिलास असून आपल्याला थांबविण्या विरोधकांचा शेवटचा
प्रयत्नही निष्फळ ठरला असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

याबाबत माहिती देताना बावडेकर, केळकर म्हणाले, महापालिकेतील काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला रोखण्यासाठी भाजपाच्या पुढाकाराने सन 2013 ला स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीमार्फत भाजपाच्या कोटय़ातून आम्ही निवडून आलो. या आघाडीने यानंतर मनपाच्या कारभारामध्ये सातत्याने स्थानिक घडामोडीत वेगवेगळी भूमिका घेतली. आघाडीचा हा निर्णय पटला नाही. त्यामुळे महापौर निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. यानंतर स्वाभिमानी आघाडीची नेंदणीच रद्द झाली. त्यामुळे आम्ही भाजपाची स्थापना करण्याची मागणी केली.

यामुळे पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने स्वाभिमानीचे तत्कालीन गटनेते शिवराज बोळाज यांनी आम्हा दोघांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी लेखी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. या अर्जावर गेली वर्ष दीड वर्ष सुनावण्या झाल्या. अखेर विभागीय आयुक्तांनी बोळाज यांचा अर्ज फेटाळल्याचा निकाला दिला आहे. तसे लेखी पत्र महापालिका व आम्हाला दिले आहे. हा निकाल म्हणजे गेल्या 30 वर्षात गावभागात केलेल्या नागरिकांच्या चांगल्या कार्याची पोच पावती आहे. हा सत्याचा विजय आहे. यापुढे नागरिकांची सेवा करीतच राहणार असल्याचे सांगून बावडेकर व केळकर म्हणाले, आमचे नगरसेवक रद्द झाले नसताना काहींनी खोडसाळपणे माहिती प्रसार माध्यमांना देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण, अशांना आम्ही घाबरत नाही. आम्हाला थांबविण्याचा शेवटचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.