|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीकरांनी केले बदलासाठी मतदान

पणजीकरांनी केले बदलासाठी मतदान 

प्रतिनिधी /पणजी :

पणजीकर मतदारांनी पोटनिवडणुकीत संतापून बदलासाठी मतदान केल्याचे काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांनी म्हटले असून पणजीतील मतदारांची मते जिंकल्याचा दावा केला आहे.

पणजीच्या मतदारांचे पत्रकार परिषदेत आभार मानून त्यांनी सांगितले की पणजीत 70 टक्के मतदान झाले असून मतदारांनी योग्य तो कौल बदलासाठी दिला आहे. दादागिरी करणाऱयांना मतदार त्यांची जागा दाखवतील आणि सोमवार दि. 28 ऑगस्ट रोजी मतदारांचा कौल काय तो कळेल असे सांगून बदलासाठी मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान रोहीत ब्राझ डिसा यांनी पणजी पोटनिवडणुकीत पोलीस व मुख्य निवडणूक अधिकारी (आयोग) यांच्या भूमिकेबाबत शंका प्रकट केला असून ते नि:पक्षपाती नसल्याचे मत प्रकट केले. पोलीस-आयोग हे भाजपबरोबर व पर्रीकरांसोबत असल्याचे वेळोवेळी दिसून आल्याचा दावा त्यांनी केला आणि त्याची काही उदाहरणे दिली. अशा परिस्थितीत सदर निवडणूक मोकळी-नि:पक्ष झाल्याचे दिसून येत नाही असे त्यांनी नमूद केले.

महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व नगरसेविका शीतर नाईक यांनी विनाकारण भांडणतंटा केला. या प्रकरणी तक्रार देण्यास गेलो तर पोलिसांनी टाळाटाळ केली परंतु त्या घटनेनंतर पाच तासांनी त्यांची तक्रार मात्र लगेच स्विकारण्यात आली. हा असा भेदभाव पोलिसांकडून होतो याकडे श्री. डिसा यांनी लक्ष वेधले. तसेच त्यांनी तक्रार चुकीची व तथ्यहिन असल्याचा दावा केला आहे.