|Thursday, May 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » बाप्पा विशेष : लालबागच्या राजाच्या चरणी दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण

बाप्पा विशेष : लालबागच्या राजाच्या चरणी दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण 

ऑनलाइन टीम / मुंबई :

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या चरणी एका भाविकाने 1 किलो 101ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या आहेत. या दोन्ही मूर्तींची किंमत सुमारे 31 लाख 51 हजार रूपये आहे.

गणपती आणि लक्ष्मी अशा या दोन सोन्याच्या मूर्ती आहे. गणेशोत्सवानिमित्त पहिल्याच दिवशी एका भाविकाने दानपेटीत ह्या मूर्ती टाकल्या होत्या.या मूर्ती दान करणाऱया भाविकांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजाची ख्याती आहे.त्यामुळे लाखो भाविक बाप्पाकडे नसव करतात आणि तो फेडण्यासाठी त्याच्या चरणी लीन होतात.प्रत्येकवर्षी लालबागचा राजाच्या चरणी भाविकांकडून कोटय़ावधींची देणगी अर्पण केली जाते. लालबगचा राजा गणेश मंडळ ह्या देणगीचा लिलाव करून, त्यामधून येणाऱया पैशांचा उपयोग समाजपयोगी कामांसाठी केला जातो.

 

Related posts: