|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मंडणगडात 1 हजार 70 गणेशमूर्तींचे विसर्जन

मंडणगडात 1 हजार 70 गणेशमूर्तींचे विसर्जन 

प्रतिनिधी /मंडणगड

तालुक्यात घराघरात विराजमान झालेल्या दिड दिवसांच्या गणरायांना शनिवार सायकांळी उशिरापर्यंत भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्यात विविध ठिकाणी 1070 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले

यामध्ये मंडणगड पोलीस स्थानकाचे हद्दीत 920 गणेश मूर्तीचा तर बाणकोट सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 170 गणेश मूर्तीचा समावेश आहे. शुक्रवारी मुसळधार पावसातच गणरायांचे आगमन झाले. ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. शनिवार सकाळी तालुक्यात 69 मि. मी. पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आतापर्यंत 2 हजार 829 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान शनिवारीही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अशातच दिड दिवसांच्या गणेशमूर्त्याच्या विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संभाजी यादव, तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी प्रदीप मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनासाठी शनिवारी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related posts: