|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बाप्पा’ची प्रतिष्ठापना अन् भक्तीमय सुगंधाची दरवळ!

‘बाप्पा’ची प्रतिष्ठापना अन् भक्तीमय सुगंधाची दरवळ! 

शहर, गावागावात भक्तगणांच्या उत्साहाला उधाण

आकर्षक सजावटीत झाली घरोघरी प्रतिष्ठापना

प्रतिनिधी /रत्नागिरी

लाडक्या गणरायाचे जिल्हाभरात सर्वत्र भक्तीपूर्ण व उत्साही वातावरणात आगमन झाले आहे. शुक्रवारी जिल्हय़ात सुमारे 1 लाख 67 हजार 866 खासगी व 111 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाच्या आगमनाला ‘वरूणराजा’ची हजेरी बळीराजाला सुखावणारी ठरली. घरोघरी गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गावागावातील वातावरण भक्तीमय होऊन गेले आहे.

विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन म्हणजे सर्वत्र चैतन्य पसरून जाते. शुक्रवारी ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत सारे भक्तगणांच्या आनंदात एकरूप होऊन गेले होते. अगदी वाजत-गाजत शहर व ग्रामीण भागात गणरायाचे आगमन मोठय़ा डामडौलात झाले. स्वागतासाठी मनमोहक, आकर्षक अशा तयार करण्यात आलेली आरास व त्यामध्ये गणरायाची अगदी मनोभावे विधीवत प्रतिष्ठापना झाली आहे.

प्रबोधनात्मक देखावे भाविकांचे आकर्षण

बाप्पाचा हा आनंदोत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. पण या दरम्यान गणरायाच्या ठिकाणी चालणारे मंत्र, स्त्रोत्र, पूजा-पाठ, भजन-कीर्तन अशा साऱया कार्यक्रमांनी वातावरणाचा सर्वत्र भक्तीमय सुगंध दरवळू लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्व मंडळाच्या ठिकाणी करण्यात आलेली आरास आकर्षण ठरत आहे. तर ग्रामीण भागातही अनेक हौशी कलाकारांकडून घरगुती गणेश सजावटीला महत्व दिले जात आहे. त्यावेळी चलचित्र देखावे, सामाजिक प्रबोधनात्मक देखावे भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. त्यातून सजावट स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले आहे.

जिल्हय़ात विसर्जित होणाऱया गणपतींची संख्याः

दिवस                  सार्वजनिक           खासगी

दिड दिवस                 2                   9968

पाच दिवस                 2                  2398

गौरी-गणपती            17                116028

आठवा दिवस            5                     01

वामन द्वादशी          8                    2829

दहावा दिवस               1                  110

अकरावा दिवस            2                  150

अनंत चतुर्दशी           64                36314

तेरावा दिवस             10                   09

एकवीस दिवस           –                     59

Related posts: