|Thursday, October 18, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2017

मेष

या आठवडय़ात मंगळ सिंह राशीत प्रवेश करीत आहे. रविवार घरातील कामामध्ये जाणार आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. सोमवार, मंगळवार थोडा प्रकृतीवर ताण पडू शकतो. धंद्यात फसगत संभवते. मात्र बुधवारपासून आपला प्रगतीरथ वेगाने धावू लागणार आहे. कलाक्रीडा क्षेत्रात एखादी संधी मिळेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले डावपेच यशस्वी ठरतील. प्रॉपर्टीच्या व्यवहारात किंवा अडलेल्या कामातील गुंतागुंत हळूहळू सुटणार आहे. ग्रहांच्या साथीने मोठी उडी घेणार आहे. प्रवासाचे बेत आखले जातील.


वृषभ

मंगळाच्या राश्यांतराने प्रेमप्रकरणात अडचणी निर्माण होऊ शकतात. गैरसमज, वाद, संभवतात. रविवारच्या दिवशी छोटय़ा कारणावरून जीवनसाथीबरोबर वाद घालू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने घरातील समस्या रेंगाळत पडू शकतात. राजकीय क्षेत्रात अनुभवी व्यक्तीच्या विचाराने निर्णय घेतल्यास यश नक्की मिळेल. शंकराची उपासना करा. अडचणी कमी होतील. कधीकधी मौन राहिल्याने  वाद टाळता येत असतील तर तसे करा. शेतीच्या कामात मात्र  यश व पैसा मिळणार आहे.


मिथुन

मंगळाच्या राश्यांतराने भावंडे, मित्र तुमच्याबरोबर स्पर्धा करतील. कौटुंबिक वाटाघाटीत मतभेद होतील. परंतु प्रश्न तडजोड करून मार्गी लावता येतील. सोमवार, मंगळवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांचा त्रास होईल. मुलांच्या सुखासाठी प्रयत्न कराल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे येतील. धंद्यात फायदा संभवतो. मात्र भागीदारीत सावध रहा. शेतकरी वर्गाने जमिनीच्या व्यवहारात सावध राहा. शेती सोडून इतर व्यवसाय करण्याची संधी जरी आली तरी घाईत निर्णय घेऊ नका. अपमान झाला तरी सहन करा.


कर्क

मंगळाचे राश्यांतर आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात लवकर निर्णय घेतल्यास योग्य ठरेल. नंतर रखडण्याची शक्मयता जास्त आहे. नोकरीत, राजकीय क्षेत्रात वरि÷ व सहकारी वर्ग आपल्याबरोबर चांगले वागत नसल्याचा त्रास जास्त होणार आहे. नोकरीत जर बदल हवा असेल तर उद्याच प्रयत्न करा. गुरुवार व शुक्रवार तणाव वाढविणाऱया घटना घडतील. चारी बाजूने प्रगती करण्याची संधी नसल्याने जी संधी येईल ती सोडू नका. प्रयत्नावर जास्त लक्ष द्या. वाहन खरेदी करू शकाल.


सिंह

मोठा निर्णय मग तो प्रॉपर्टीचा असो किंवा प्रकृतीबाबत असो, थोरामोठय़ांच्या सल्ल्याने घेतल्यास चुकणार नाही. नोकरीत छोटय़ा अडचणी येतील. पण आपण बुद्धिचातुर्याने त्यावर मात करू शकाल. रेंगाळत पडलेल्या कामांना गुरुवारपासून गती मिळेल. मंगळाच्या राश्यांतराने प्रतिकारशक्ती वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती संभवते. यंदाचे सण आपणास जास्त आनंद देणारे असणार आहेत. नवीन नाते जुळण्याची शक्मयता आहे. शेतकरीवर्गाने आताच पिकाचा व्यवहार केल्यास जास्त फायदा संभवतो.


कन्या

कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. संतती संबंधी खूषखबर मिळेल. धंद्यात जम बसेल. मोठे स्वप्न नुसते पाहू नका त्या दिशेने कृती करा. यश नक्की मिळेल. मंगळाच्या राश्यांतराने दुखापत, अपघात संभवतो. वाहन जपून चालवा. महिलांनी घरातील कामे करताना प्रकृतीची काळजी घ्यावी. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व आर्थिक लाभ होईल. शेतकरी वर्गाने दुसऱयाच्या भरोशावर राहून व्यवहार करू नये. पिकाला चांगली किमत मिळत असेल तर जास्त लोभ ठेवू नका. अविवाहितांचे योग जुळून येतील. प्रेमप्रकरणात मात्र सावध रहा. फसगत संभवते.


तूळ

नोकरीत महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही  बाजू ऐकून घ्या. मगच योग्य निर्णय घ्या. नाहीतर आपल्यावरचा विश्वास कमी होईल. हा आठवडा घरगुती कामात व भेटीगाठीत जाणार आहे. नवीन ओळखी होतील. त्यातून कामे मिळवू शकाल. प्रति÷ित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. घरात शुभ समाचार मिळेल. धंद्यात चांगली सुधारणा करता येईल. नवे कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात उत्साहवर्धक वातावरण राहील. प्रेमाला चालना मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात  प्रयत्नाने मोठे यश प्राप्त करू शकाल.


वृश्चिक

धार्मिक कार्यात आपले योगदान असेल. तुम्ही करत असलेल्या कामात तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. रविवार थोडा तणावाचा जाणार आहे. लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकाल. पण ठोस आश्वासने देऊ नका. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. पुढचा काळ थोडा कठीण आहे. परदेशगमनाची संधी आल्यास लवकर निर्णय घ्या. नोकरीत आताच बदल करा. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात नामवंत लोकांचा सहवास लाभेल. शेतकरीवर्गाने पुढच्या काळात कुठल्या पिकांची लागवड करणे योग्य ठरेल. याचा निर्णय अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने घ्या. निसर्गावर दोष देण्यापूर्वी आपल्या चुका पहा.


धनु

मंगळाच्या राश्यांतराने वाद, गैरसमज मिटतील. आपल्या संबंधीत वरि÷ांची चुकीचा समज दूर करता येईल. तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना येईल. नवीन धंदा सुरू करता येईल. चांगले भागीदार मिळतील. एखादी कोर्टकेस किंवा चौकशी सुरू असल्यास त्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्मयता आहे. गणेशाची आराधना करा. मार्ग सापडेल व संकटे दूर होतील. विद्यार्थीवर्गाने जे क्षेत्र निवडले आहे. त्यात यश मिळेल. मात्र आळस करू नका. कुटुंबाबरोबर प्रवासाचे बेत आखले जातील. सोमवार, मंगळवार आरोग्याची काळजी घ्या.


मकर

मंगळाच्या राश्यांतराने आरोग्य थोडे बिघडण्याची शक्मयता आहे. व्यवसायात प्रगतीची संधी मिळाली तरी वादाचे प्रसंग येतील. घरात गुरुवार, शुक्रवार क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येण्याचा संभव आहे. मात्र बुद्धिचातुर्याने मार्ग सापडेल.  कोर्टकचेरीत चिंता वाढेल. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात पुढे याल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात मतभेद संभवतात. मोठी खरेदी शक्मय होईल. तुमच्या प्रगतीमधील छोटय़ा अडचणी निर्माण होतील. नोकरी धंद्यात चांगले बदल होईल. शेतीत प्रगती संभवते. वाहन जपून चालवा.


कुंभ

मनावरील दडपण कमी होईल. कामांना गती मिळाल्याने उत्साह वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. सणामध्ये नवीन ओळखी होतील. आपण समाजकार्यात पुढे येऊ शकाल. नाटय़चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मंगळाच्या राश्यांतराने जमिनीच्या व्यवहारातील प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ संभवतो. शेअर्स, लॉटरीत फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात विचारवंतांच्या सल्ल्याने योग्य निर्णय घ्या. महत्त्वाची व अडचणीत आलेली कामे या सप्ताहात पूर्ण होऊ शकतात. श्रीगौरीच्या कृपेने तुमच्या कार्याला अधिक प्रसिद्धी मिळेल. सहकार्य मिळेल. प्रेमातील तणाव वाढवू नका. मैत्रीत मतभेद होतील.


मीन

सिंह राशीत मंगळाचे राश्यांतर सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव निर्माण करण्याची शक्मयता आहे. जमीनसंबंधी व्यवहारात सौम्य शब्दात चर्चा करा. धंद्यात मजूर वर्गाकडून त्रास होऊ शकतो. संसाराच्या समस्येत जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. प्रेमाला योग्य वळण देण्याची संधी शोधा. शैक्षणिक क्षेत्रात प्रवेशासाठी प्रयत्न करा.  वडिलधाऱया माणसांच्या बरोबर नम्रतेने बोला. कायद्याचे पालन करा. गुप्तकारवायांच्याकडे लक्ष ठेवा. प्रतिक्रिया व्यक्त करू नका. कोर्टकेसमध्ये यश मिळू शकेल.

Related posts: